Subscribe this Blog

Wikipedia

Search results

Notifications and New Posts!

Wednesday, May 27, 2020

एमएचटी सीईटी २०२० अर्ज भरण्यासाठीची विद्यार्थ्यांना आणि पालकांना पुन्हा शेवटची सुवर्ण संधी !


राज्य सीईटी सेलकडून दिलेली एमएचटी सीईटी २०२० अर्ज भरण्यासाठीची संधी गमावलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि पालकांना पुन्हा शेवटची सुवर्ण संधी !
विद्यार्थी आणि पालकांच्या विनंत्या लक्षात घेऊन राज्य सीईटी सेल, मुंबईने एमएचटी सीईटी २०२० च्या अर्जाची नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्व एचएससी (१२वी ) पात्र / १२वी परीक्षा नुकतीच दिलेले विद्यार्थी: -

१. ज्यांनी ७ मार्च २०२० पर्यंत एमएचटी सीईटी २०२० साठी अर्ज केला नव्हता.
२. ज्या विद्यार्थ्यांनी एमएचटी सीईटी २०२० साठी नोंदणी केली आणि अर्धवट फॉर्म भरला /देय फी देण्यात अयशस्वी, आणि / किंवा आवश्यक दस्तऐवज अपलोड करू शकले नाही / अशा कारणांमुळे नोंदणी पूर्ण करू शकले नाही.
ऑनलाईन नोंदणी हि https://mhtcet2020.mahaonline.gov.in/ या वेबसाईटवर २६ मे, २०२० (००:०१ तास) पासून १ जून २०२० (२३:५९ तास) पर्यंत चालू राहील. नवीन नोंदणीसाठी, अपूर्ण फॉर्म पूर्ण करणे आणि अंतिम देय फी विलंबशुल्कासह देणे ह्या गोष्टी आहेत. ही शेवटची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. यापुढे आणखी मुदतवाढ दिली जाणार नाही. नियमित अपडेट्स आणि सूचनांसाठी कृपया www.mahacet.org या वेबसाइटला भेट द्या.
एमएचटी सीईटी २०२० हि परीक्षा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी अनिवार्य आहे, याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी, हि विनंती.
MHT CET 2020 परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा? याचा मार्गदशनपर व्हिडीओ मी या पोस्ट मध्ये देत आहे. नक्कीच विद्यार्थी व पालकांना याचा फायदा होईल.
धन्यवाद!

#sdbhosale

No comments:

Post a Comment