पन्नास वर्षांपूर्वी, 22 एप्रिल 1970 रोजी जगभरातील लोकांनी पहिला पृथ्वी दिन साजरा केला. भविष्यातील पिढ्यांसाठी, आपल्या सुंदर ग्रहाचे रक्षण करण्याच्या विषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. हा पृथ्वी दिन साजरा करण्या मागचाचा उद्देश म्हणजे आपण एका निरोगी वातावरणात जगण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. पृथ्वी ही आपली आई आहे, जी आपल्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देते. म्हणून, आपण पृथ्वीच्या नैसर्गिक वातावरणात टिकून राहण्यासाठी देखील जबाबदारी घेतली पाहिजे. आपण आपल्या छोट्या फायद्यासाठी आपण नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश व प्रदुषित करू नये असे मला वाटते.
पृथ्वीवर सकारात्मक बदल घडवायचा असेल तर आपण सामाजिक जागरूकता अभियानात सहभाग घेतलाच पाहिजे. या जागतिक वसुंधरा दिनाला खालील घोषवाक्य शेअर करा आणि लोकांना सकारात्मक संदेश द्या[1].
ह्या ब्लॉगमधील पृथ्वीचे छायाचित्र एनिमेटेड बनवण्यासाठी GIMP Software चा वापर केला आहे. GIMP Software हे एक ओपन सोर्स सॉफ्टवेयर आहे. हे सॉफ्टवेयर खुप उपयोगी आहे.
संदर्भ:
1. https://www.marathislogans.com/slogans/save-earth-slogans/
2. https://twitter.com/narendramodi
पृथ्वीवर सकारात्मक बदल घडवायचा असेल तर आपण सामाजिक जागरूकता अभियानात सहभाग घेतलाच पाहिजे. या जागतिक वसुंधरा दिनाला खालील घोषवाक्य शेअर करा आणि लोकांना सकारात्मक संदेश द्या[1].
- पृथ्वी वाचवा जीवन वाचवा.
- 'अर्थ' चं काही करा नाहीतर अनर्थ होईल.
- वेळ काहीतरी करण्याची आहे, पृथ्वीला वाचवण्याची आहे.
- पृथ्वी आपलं घर आहे तिला नष्ट करू नका.
- जंगल सुरक्षित ठेवा पृथ्वीचा विनाश वाचवा.
- जेव्हा आपली पृथ्वी हिरवीगार असेल तेव्हाच मनुष्यजाती समृद्ध होईल.
- लोकांना हे सांगणं आहे वृक्ष पृथ्वीचा दागिना आहे.
- झाडं लावा पृथ्वी जगवा.
- ओसाड धरती सांगते वृक्ष लावून माझा शृंगार करा.
- झाडं-वृक्ष वाचवा या विश्वाला वाचवा.
- वृक्षाचा खून आणि ओसाडं वन देत आहेत प्रलयाला आमंत्रण.
- झाडं लावा पाऊस पडेल आणि धरणीमातेला आनंद होईल.
- पर्यावरणाचं प्रदूषण एक उपचार नसलेला आजार आहे. हे फक्त थांबवता येऊ शकतं.
- आपल्या समाजात कोणीच नसेल जर आपण पर्यावरणचं नष्ट केलं.
- हवा, पाणी, जंगल, पशूपक्षी यांना वाचवण्यासाठीच्या योजना, खरंतर मानवाला वाचवण्यासाठी बनवण्यात आल्या आहेत.
- ईश्वराचा शोध घेण्याची गरज नाही कारण तो पशू-पक्षी आणि पर्यावरणात आहे.
- भविष्य असलं तर हिरवंगार असेल नाहीतर नसेल.
- प्रयत्न करा की, जेव्हा तुम्ही आलात त्याच्या तुलनेत जाताना पृथ्वीला एक उत्तम स्थानाच्या रूपात सोडून जा.
- पक्षी हे पर्यावरणाचे संकेतक आहेत जर ते धोक्यात असतील तर आपणही लवकरच संकटात येऊ.
- टॅक्स आणि महागाईचा विरोध करा पण कार्बन टॅक्स समर्थन करा.
- जो देश आपल्या मातीला नष्ट करतो तो स्वतःला नष्ट करतो.
- जंगल आपल्या पृथ्वीची फुफ्फुसं आहेत जी आपली हवा शुद्ध करतात. त्यांचं संवर्धन करा पृथ्वीचं संवर्धन करा.
- पृथ्वी फुलांमध्ये हसते हॅपी अर्थ डे.
- पृथ्वीची पर्वा करा येणाऱ्या पिढीला वाचवा हॅपी अर्थ डे.
- गुदमरतोय जीव, निघतोय प्राण..कोणीतरी ऐका तिची साद पृथ्वीमातेला द्या जीवनदान.
- विकासाचा ग्राफ बनवताना जंगल आणि पशुपक्ष्यांचा होतोय नाश, निसर्गाचं संवर्धन करा पृथ्वीला जीवनदान द्या.
- श्वास होत आहेत कमी चला झाडे लावूया मिळूनी
- चला एकत्र येऊन संकल्प करूया पृथ्वीमातेचं संवर्धन करूया.
आता भारताचे पंतप्रधान काय म्हणतात ते ट्विटरच्या माध्यमातून पाहु[2]:
On International Day of Mother Earth, we all express gratitude to our planet for the abundance of care & compassion. Let us pledge to work towards a cleaner, healthier & more prosperous planet.
A shout out to all those working at the forefront to defeat COVID-19. #EarthDay2020
संदर्भ:
1. https://www.marathislogans.com/slogans/save-earth-slogans/
2. https://twitter.com/narendramodi


No comments:
Post a Comment